महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प आणि जनसंकल्प असेल’, असे वित्तमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनी जाहीर केले असल्याने गुरुवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात फडणवीस कोणती घोषणा करणार याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लक्षात घेता मुंबईसह मोठ्या शहरांसाठी अधिक तरतूद तसेच शेतकरी वर्गाला खुश करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या अर्थसंकल्पात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, तसेच रोजगाराच्या प्रतीक्षेत असेलेल्या तरुणांसाठी आणि कोकणातील पर्यटन क्षेत्रात सुधारणा करण्यात यावी यासाठी काही तरतुद करण्यात यावी अशी सामान्यांची अपेक्षा आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)