आज सकाळी उमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी लालबागच्या राजा (Lalbaghcha Raja) चे दर्शन घेतले होते. उद्या अनंत चतुर्थी असल्याकारणाने देशभरातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जण होईल. त्यापार्श्वभूमीवर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सर्वच भाविक गर्दी करत आहेत. आज अजित पवारांनी माझगावच्या अंजिरवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळालाही त्यांनी भेट दिली. सोबतच, अजित पवार यांनी सिद्धिविनायक मंदिरात पूजाही केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं.
पाहा पोस्ट -
रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्यरक्षकं।
भक्तानामभयं कर्ता त्राता भव भवार्णवात्।।
आज ‘लालबागचा राजा’चे भक्तिमय वातावरणात दर्शन घेतले, श्रीगणरायाचरणी नतमस्तक झालो. सर्वांच्या जीवनात सुख-समाधान, यश, आर्थिक सुबत्ता, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे तसंच बळीराजाला, सर्वसामान्यांना सुगीचे… pic.twitter.com/WtUdylkxtz
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)