देशात कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रकोप वाढतो आहे. अशा स्थितीत केवळ निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय सभा घेणे योग्य होणार नाही. ते नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आयोजित केलेल्या आपल्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तसेच, इतर सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांनीही हा कोरोना काळात सभा घेणे योग्य आहे का, याचा विचार करावा असे अवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)