यावर्षी राज्यातील विविध भागात पूर (Flood) सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. विदर्भ (vidarbha), पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), मराठवाडा (Marathwada) अशा विविध भागातील नागरिकांना पूराचा मोठा फटका बसला. पूर परिस्थिती दरम्यान बऱ्याच भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (CM Eknath shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Deputy CM Eknath Shinde) पूरग्रस्त भागाची पहाणी केली. पूरग्रस्त नागरिकांना पूर्वी 5 हजारांची तात्काळ मदत दिल्या जात होती. पण आता त्या या मदतीत तिब्बल वाढ करण्यात आली असुन सरकारकडून आता पूरग्रस्तांना 15 हजार रुपयांची तात्काळ मदत दिल्या जाणार आहे.
Immediate relief amount given to the flood-affected persons to be increased to Rs 15,000 from Rs 5,000: Maharashtra CM Eknath Shinde in the Legislative Assembly
— ANI (@ANI) August 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)