पगाराची मागणी करणाऱ्या साफसफाई करणाऱ्या महिलेला पुण्यातील एका व्यक्तीने जोरदार मारहाण केल्याची घटना घडली आहे. पडीत महिलेने मालकाकडे तीन महिन्यांचा थकलेला पगार मागीतला होता. मात्र, हा पगार देण्यास दुकानमालकाने नकार दिला. त्यावर पैशांची गरज असल्याचे सांगत पुन्हा पगार मागणाऱ्या महिलेला सदर व्यक्तीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने महिलेच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसे लगावले. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. शिवाय आरोपी महिलेला झाडूने मारहाण करत असल्याचेही फोटोत कैद झाले आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)