Sameer Wankhede : 'छ. शिवाजी महाराज, तान्हाजी मालुसरे हे खरे नायक'; बॉलिवूड, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर स्पष्टच म्हणाले समीर वानखेडे

काही दिवसांपूर्वी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत आले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी देशातील राजकारण, बॉलिवूड, ड्रग्ज, सुशांत सिंह राजपूत मृत्यू अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं.

Sameer Wankhede : 'छ. शिवाजी महाराज, तान्हाजी मालुसरे हे खरे नायक'; बॉलिवूड, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर स्पष्टच म्हणाले समीर वानखेडे
Photo Credit - Facebook

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांनी 'aakar Digi9' ला मुलाखत दिली. त्यात त्यांनी बॉलिवूडची मोठ्या प्रमाणावर निंदा केली. बॉलिवूड स्टार्स माझ्यासाठी सेलिब्रिटी नाहीत, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ), बाबा आमटे (Baba Amte), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), तान्हाजी मालुसरे (Tanhaji Malusare), बाजीप्रभू देशपांडे (Baji Prabhu Deshpande) हे खरे नायक आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण ही माझ्या आयुष्यातील सर्वात छोटी केस होती. लोकांना ती फार महत्त्वाची वाटली. झाकीर नाईक (Zakir Naik) सारख्या आतंकवादीवर केस केली, त्यावेळी त्या रक्ताचा रंग लोकांनी विचारला नाही. बौद्ध आहे की महार, हिंदू आहे की मुस्लिम या गोष्टी कोणी नाही विचारल्या. (हेही वाचा:Sameer Wankhede Corruption Case: समीर वानखेडे यांच्या घरावर CBI चा छापा, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2024 01:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).