Mann Ki Baat: ‘मन की बात’च्या शंभराव्या भागानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी हजारो कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य कार्यक्रम मुंबईत राजभवनावर होणार असून त्यात पद्म पुरस्कार विजेते, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मन की बात चा शंभरावा भाग ऐकण्यासाठीची राज्यात विविध ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे. यात पद्म पुरस्कार विजेते, मन की बात मध्ये प्रधानमंत्र्यांनी उल्लेख केलेले मान्यवर, कला आणि चित्रपट क्षेत्रातले व्यक्ती सहभागी होणार आहेत. गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन, पेन्शनमधला मोठा हिस्सा स्वच्छता मोहिमेसाठी देणारे चंद्रकांत कुलकर्णी, चंद्रपूर आणि पालघरमधले आदिवासी, सायकलपटू महाजन बंधू वगैरे मान्यवर सहभागी होणार आहेत. या निमित्त केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रादेशिक कार्यालयानं याठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर आधारित प्रदर्शन उभारलं आहे. केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागानंही याठिकाणी पुस्तक प्रदर्शन साकारलं आहे. (हेही वाचा - PM Modi Inaugurates FM Transmitters: देशात FM संपर्क व्यवस्थेच्या विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं 91 नवीन 100 व्हॅट एफएम ट्रान्समीटर्सचे उद्घाटन)
प्रधानमंत्र्यांच्या मन की बातचा शतकमहोत्सवी भाग उद्या प्रसारित होणार, श्रोत्यांची जय्यत तयारी/ देशभरातल्या राजभवनांमधे विशेष कार्यक्रमांचं आयोजन#MannKiBaat @PMOIndia @narendramodi @mannkibaat https://t.co/lWu0WYREgg
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)