राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत होत असून या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमने सामने आहेत. यादरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा एक फोटो व्हायरल झाला होता.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)