Bombay HC Issues Notice To MP Ravindra Waikar: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Polls) मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या गटातील रवींद्र वायकर (Ravindra Waikar) विजयी ठरले. त्यांनी अवघ्या काही मतांनी शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला. मात्र किर्तीकर यांनी रवींद्र वायकर यांच्या निवडीला आव्हान देत, मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आता अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेवर, मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी खासदार रवींद्र वायकर यांना समन्स नोटीस बजावली.
वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाल्यानंतर, त्यांच्या विजयाला आव्हान देण्यात आले. कीर्तिकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत वायकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवडणूक बाजूला ठेवण्याची आणि ती ‘रद्द आणि निरर्थक’ घोषित करण्याची विनंती उच्च न्यायालयाला करण्यात आली. वायकर हे 452644 मतांनी विजयी झाले, तर कीर्तिकर यांना 452596 मते मिळाली. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून विविध स्पष्ट आणि गंभीर त्रुटी होत्या, ज्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जागावाटपासाठी काँग्रेसने स्थापन केली समिती; 'या' 10 दिग्गज नेत्यांचा समावेश)
पहा पोस्ट-
Shiv Sena Vs Shiv Sena: Bombay HC Issues Summons to Ravindra Waikar on Amol Kirtikar’s Plea
Read More: https://t.co/vNJZ5P5wdI#shivsena #bombayhighcourt #ravindrawaikar #amolkirtikar #legallyspeaking
— Legally Speaking (@legallyspking) July 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)