Hasan Mushrif यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरूद्ध ईडी पुढील सुनावणी, 24 एप्रिल पर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू शकत नाही. त्यांच्याकडून FIR रद्द करण्याची मागणी कोर्टात करण्यात आली आहे. दरम्यान मुश्रीफ यांच्याविरुद्ध कोल्हापुरातील मुरगूड पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विवेक कुलकर्णी नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ED सक्रिय करता यावी याकरिता कायद्याचा गैरवापर करून एफआयआर दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पहा ट्वीट
Bombay HC grants relief to NCP leader Hasan Mushrif; directs ED to not take any strict action against him until April 24-next date of hearing
He approached HC to cancel cases registered by Kolhapur Police, on basis of which ED is taking action after filing the case
(File pic) pic.twitter.com/0Ro71fdGA8
— ANI (@ANI) March 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)