शिवसेनाप्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10वा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत आज अनेक राजकीय मंडळींनी ट्वीटरच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये त्यांच्या स्मृतिस्थळावर देखील अनेकांनी नतमस्तक होण्यास गर्दी केली आहे. बाळासाहेबांचे नातू आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी वचन देतो की प्रत्येक श्वास देशासाठी, महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी! असं म्हणत एक खास फोटो शेअर केला आहे.
आदित्य ठाकरे ट्वीट
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना शतशः नमन! तुमच्या स्मृतिदिनी माझं तुम्हाला वचन, प्रत्येक श्वास देशासाठी, महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी! pic.twitter.com/FjOVbif7KR
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 17, 2022
संजय राऊत
हे नाते खुप जुने आहे.
ये रिश्ता बहोत पुराना है..
साहेब..
विनम्र अभिवादन !
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/vDhofuiVbi
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
साहेब आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात...
वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख स्वर्गीय #बाळासाहेब_ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...#BalasahebThackeray pic.twitter.com/FjuqsaWSqf
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 17, 2022
नितीन गडकरी
हिंदुहृदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना कोटी-कोटी अभिवादन. #BalasahebThackeray pic.twitter.com/K53tKVD5T1
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 17, 2022
सुप्रिया सुळे
महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. pic.twitter.com/N8qUPEPHfM
— Supriya Sule (@supriya_sule) November 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)