Crocodile Trail In Rani Baug: राणीच्या बागेला भेट देणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण, आता येथे येणाऱ्या पर्यटकांना चक्क पाण्याखालील मगरी आणि घरियाल पाहता येणार आहे. 162 वर्षीय जुन्या वीरमाता जिजाबाई भोसले बोटॅनिकल गार्डन आणि प्राणीशास्त्र संग्रहालयाने मगरी आणि घरियाल पाहण्यासाठी पाण्याखालील दृश्य डेकसह 'क्रोकोडाइल ट्रेल' लाँच केले आहे. जे आशियातील पहिले 'क्रोकोडाइल ट्रेल' आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. राणीच्या बागेत सध्या तीन मगरी आणि दोन घारियाल आहेत. सुमारे एक एकर पाणी आणि हिरवळ पसरलेल्या, क्रोक ट्रेलमध्ये मगरी आणि घरियाल यांच्यासाठी स्वतंत्र एन्क्लोजर आहेत. थोड्याच दिवसात देशातील इतर प्राणीसंग्रहालयांमधून येथे आणखी काही मगरी सोडण्यात येणार आहेत. (हेही वाचा - BMC: मुंबईमध्ये 2022 पासून खड्ड्यांच्या 14,000 हून अधिक तक्रारी प्रलंबित; विरोधकांकडून BMC वर टीका)
The 162-year-old Veermata Jijabai Bhosle Botanical Garden & Zoological Museum launched a '#Crocodile Trail' with an underwater viewing deck, billed as the first of its kind in #Asia, to view crocodiles and #gharials, officials said. pic.twitter.com/U600HE0wYt
— IANS (@ians_india) May 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)