Amruta Fadnavis vs Mumbai Designer Case: अमृता फडणवीस यांना लाच दिल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला अटक केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी अनिक्षाविरोधात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अमृता फडणवीस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर मलबार हिल्स पोलिस स्टेशनने 20 फेब्रुवारी रोजी एफआयआर नोंदवला होता. तसेच अनिक्षा आणि तिच्या वडिलांचे नाव आरोपी म्हणून नोंदवण्यात आले होते.
Amruta Fadnavis vs Mumbai designer case | Accused Aniksha Jaisinghani remanded to police custody till March 21
— ANI (@ANI) March 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)