आज विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, तसेच शिवीगाळही केली. त्यानंतर प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “दानवे यांनी माझ्याशी गैरव्यवहार करत मला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली. अंबादास दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी.” त्याचबरोबर भाजपाने दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.”

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)