Accident Caught on Camera: गेल्या महिन्यात पुण्यातील कल्याणीनगर भागात एका पोर्श कारने दुचाकीस्वार दोन अभियंत्यांना धडक दिली होती. या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. हे प्रकरण चर्चेत असताना आता, पिंपरी चिंचवड शहरात भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव वेगात आलेल्या कारने महिलेला जोरदार धडक दिली. कारने महिलेला इतकी जोरदार धडक दिली की ती हवेत फेकली गेली आणि दूरवर जाऊन पडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ही घटना 12 जून रोजी पिंपरी चिंचवड एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वराज चौकात घडली होती. कारची धडक बसल्यानंतर चालकाने पीडितेला रुग्णालयात नेले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. महिलेची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झाल्याची माहिती नाही. (हेही वाचा: Man Making Reel Crushed To Death By Elephant: बिजनौरमध्ये रील बनवणाऱ्या तरुणाला हत्तीने चिरडले; पंधरा सेकंदात झालेल्या वेदनादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल)
पहा व्हिडिओ-
VIDEO | A woman was thrown in the air and seriously injured after being hit by a speeding car in Pimpri Chinchwad city of Maharashtra.
The incident is said to have happened on June 12 at the Swaraj Chowk in MIDC Bhosari Police Station limits. The woman was later taken to the… pic.twitter.com/uyoLuB2L51
— Press Trust of India (@PTI_News) June 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)