Goregaon-Mulund Link Road Project: महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाची गोरेगावच्या टोकावर पायाभरणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, हे पाऊल मुंबईच्या प्रवासाच्या मार्गात पूर्णपणे बदल घडवून आणेल. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या (उड्डाणपुलाच्या) गेल्या महिन्यात झालेल्या भूमिपूजनानंतर, आज गोरेगाव टोकावरील उड्डाणपुलाची पायाभरणी करण्यात आली. जीएमएलआर मार्गाचा कायापालट करणार आहे. मुंबईत वेळेवर प्रवास पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)