पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खान यांचा सिनेमा The Legend of Maula Jatt भारतामध्ये रीलीज होण्याची तयारी सुरू असताना महाराष्ट्रात त्याच्या रीलीजला मनसे ने प्रखर विरोध दर्शवला आहे. 2022 साली रीलीज झालेला हा सिनेमा पुन्हा प्रदर्शन होत आहे पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. 'नवरात्रोत्सवाच्या आसपास हा सिनेमा रीलीज होणार आहे त्यामुळे कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे.' अ‍शी भावना त्यांनी X वर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहली आहे. दरम्यान Director Bilal Lashari यांनी हा सिनेमा भारतात केवळ पंजाब मध्ये 2 ऑक्टोबरला रीलीज होणार असल्याची माहिती दिली आहे.

राज ठाकरे यांचा कडक इशारा  

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)