Hemophilia वरील औषध Hemgenix आतापर्यंत मान्यता मिळालेलं सर्वात महागडं औषध ठरलं आहे. अमेरिकेच्या एफडीए कडून त्याला मान्यता मिळाली आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत तब्बल 28.51 कोटी आहे. CSL Behring हे त्यांचे मॅन्युफॅक्चरर आहेत. Hemgenix ही हिमोफिलिया बी असलेल्या प्रौढांवर उपचार करण्यासाठी जीन थेरपी आहे. हा एक अनुवांशिक रक्तस्त्राव विकार ज्यामध्ये लोक रक्ताच्या गुठळ्या तयार करण्यासाठी आवश्यक प्रोटीन तयार करत नाहीत. 40,000 लोकांपैकी सुमारे एकाला हा आजार आहे, त्यापैकी बहुतेक पुरुष आहेत. नक्की वाचा: Bharath Biotech: यूएस एफडीएने भारत बायोटेकला दिला झटका, कोवॅक्सीनच्या क्लिनिकल चाचणीवर घातली बंदी .
पहा ट्वीट
The FDA on Tuesday approved Hemgenix, a new drug to treat hemophilia. Manufacturer CSL Behring set the price at $3.5 million per treatment, making it the most expensive drug in the world. https://t.co/wmNrIvzOxX
— CNN (@CNN) November 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)