India's Butter Garlic Naan : TasteAtlas जगातील 100 सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थांची रँकिंग देणाऱ्या मनोरंजक यादीसह परत आले आहे. भारतीय पाककृती, जगातील सर्वात आवडत्या पाककृतींपैकी एक आहे.बटर गार्लिक नान हे TasteAtlas च्या “जगातील 100 सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ” या यादीतील सर्वोच्च क्रमांकाचे भारतीय डिश आहे. बटर गार्लिक नान हा फ्लॅटब्रेडचा एक स्वादिष्ट प्रकार आहे.बटर गार्लिक नान या यादीत सातव्या स्थानावर आहे.व पिकान्हा हा ब्राझिलियन पदार्थ यादीत अव्वल क्रमांकावर आहे. मलेशियाचा रोटी काना (फ्लॅटब्रेड) आणि प्रसिद्ध थाई डिश फाट फाट काफ्राव ही पटो पाट2 आणि 3 क्रमांकावर आहे.भारतीय पदार्थांकडे परत येताना, टिक्का आणि तंदूरी यांनी ४७वे आणि ४८वे स्थान मिळवून टॉप-५० मध्ये स्थान मिळवलेआहेत.TasteAtlas हे जगभरातील पारंपारिक खाद्यपदार्थांसाठी एक प्रायोगिक  ऑनलाइन मार्गदर्शक आहे.  हेही वाचा: Bengaluru Low Price Food Restaurant: कमालच! 10 रुपयांत इडली, 20 रुपयांमध्ये वडा? बंगळुरुतील रेस्टॉरंट सोशल मीडियावर चर्चेत

जगातील 100 सर्वोत्कृष्ट पदार्थांची यादी  पहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by TasteAtlas (@tasteatlas)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)