पतीच्या दीर्घायुष्यासाठी महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वट पौर्णिमा (Vat Purnima) साजरी करण्याची प्रथा आहे. या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सकाळी वडाची साग्र संगीत पूजा करून, वडाभोवती सूत गुंडाळून सातजन्मी हाच पती मिळावा म्हणून पत्नीकडून पूजा केली जाते. संपूर्ण भारतामधील स्त्रिया वडाची पूजा करताना जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. या दिवशी वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व असून तो अनेक वर्ष आयुष्य असणारा एक भक्कम वृक्ष म्हणून ओखळला जातो. यमाकडून चातुर्याने पतीचे प्राण परत मिळवणार्या सावित्रीच्या पतिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. त्याचसोबत वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया एकमेकांना वाण देतात. तर वट पौर्णिमेनिमित्त 'या' सोप्प्या, सुंदर रांगोळी काढून अंगण सजवा.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)