Chhatrapati Pratap Singh Maharaj Jayanti Wishes: श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (Chhatrapati Pratap Singh Maharaj) यांची आज जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. प्रतापसिंह हे शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते. सन १७९३ च्या सुमारास छत्रपती प्रतापसिंहांचा जन्म झाला. सातार्याचे छत्रपती दुसरे शाहू सन १८०८ च्या सुमारास मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह छत्रपती झाले. छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या जयंती निमित्त खासदार उदयनराजे भोसले, भाजप युवा मोर्चाचे सदस्य सचिन जायभाये आदी नेत्यांनी ट्विट करून त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे.
पहा ट्विट -
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची आज २३१ वी जयंती' सातारा शहर परिसरात शाळा, छापखाना, पुस्तकनिर्मिती, राजवाडा बांधकाम, कल्पक पाणीपुरवठा योजना अशा सुधारणा करणारे जनहितदक्ष छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा. pic.twitter.com/39CIWYQa6Z
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 18, 2024
युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज, साताऱ्यात शाळा, छापखाना, पुस्तकनिर्मिती आदी योजना सुरू करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या जयंती निमित्त विन्रम अभिवादन! #छत्रपती_प्रतापसिंह_महाराज pic.twitter.com/f4DEc1W0Ej
— Sachin Rambhau Jaybhaye (@sachinrjaybhaye) January 18, 2024
भारतातील सर्वात पहिली महिला शाळा काढणारे आपल्या राज्यामध्ये सर्वात पहिली पुस्तक छापणारी प्रेस सुरू करणारे 40शाळा सुरू करणारे बुद्धिनिष्ठ चारित्र्यसंपन्न लोक राजा छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या जयंती निमित्त त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे विनम्र अभिवादन pic.twitter.com/jvewfetclg
— Arbaj Shaikh Mokashi (@arbaj55997412) January 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)