7 ऑक्टोबर दिवशी अश्विन सुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवाची (Sharadiya Navratri) सुरूवात झाली आहे. 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. उद्या नवरात्रीची तिसरी माळ म्हणजेच तिसरी दिवस आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी राखाडी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते, नव दुर्गा मध्ये चंद्रघंटा तिसरी दुर्गा मानली जाते.

या देवीचे वाहन सिंह आहे आणि या देवीला 10 हात असून तिच्या हातात कमळ आणि कमंडल शिवाय वेगवेगळी शस्त्रे आहेत, ती आसुरी शक्तींपासून संरक्षण करतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)