'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून भारतामध्ये मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे 'बाळशास्त्री जांभेकर' (Balshatri Janbhekar) यांचा जन्मदिवस (6 जानेवारी) मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मग आज या दिवसाचं औचित्य साधत बाळशास्त्रींना अभिवादन करत राज्यातील पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवरांनीही ट्वीट्स करत आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्राचे राज्यपाल
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन व पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Remembering the founder of ‘Darpan’ Balshastri Jambhekar. Extend my heartiest greetings to all journalists on Patrakar Din
— Governor of Maharashtra (@maha_governor) January 6, 2022
सुप्रिया सुळे
बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील 'दर्पण' हे पहिले वर्तमानपत्र सुरु करुन मराठी पत्रकारितेचा पाया घातला. त्यांचा कणखर बाणा आजच्या पत्रकारितेतूनही दिसतो. त्यांच्या जयंतीनिमित्त 'पत्रकार दिन' साजरा करतात. यानिमित्ताने सर्व पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा व जांभेकरांना विनम्र अभिवादन. pic.twitter.com/YUMtQN2XgR
— Supriya Sule (@supriya_sule) January 6, 2022
अशोक चव्हाण
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन आणि पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/JKaPYTyegk
— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 6, 2022
नवाब मलिक
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले आणि आपल्या परखड लेखणीने समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या देशातील सर्व पत्रकार बंधु - भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!#पत्रकार_दिन pic.twitter.com/YFcvqwkOya
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 6, 2022
आदिती तटकरे
पत्रकारितेच्या माध्यमातून ज्ञानप्रसाराचे कार्य करणारे मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! तसेच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकार बंधू-भगिनींना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! pic.twitter.com/qGgl61yIPy
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)