मुंबईसह देशभरातील लोकप्रिय आणि अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या फर्स्ट लूक समोर आला आहे. भक्तांना गणेश चतुर्थीच्या आधी त्यांच्या लाडक्या बाप्पांचे दर्शन झाले आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लाइव्ह स्ट्रिमिंगने सोमवार, 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता यंदाच्या मूर्तीचे दर्शन घडवले. अशाप्रकारे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ महामारीमुळे दोन वर्षांनंतर सार्वजनिक गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'नवसाला पावणारा' अशी या गणपतीची ख्याती आहे.
#WATCH | Maharashtra: The first look of 'Lalbaugcha Raja' unveiled in Mumbai ahead of #GaneshChaturthi pic.twitter.com/NOn454cIHt
— ANI (@ANI) August 29, 2022
@LalbaugchaRaja pic.twitter.com/HCa4Qa8AVP
— Vedant Sapte (@saptespeaks) August 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)