Rani Lakshmibai's Death Anniversary 2023: आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी देशभरात साजरी होत आहे. लोक राणीच्या स्मृतिस अभिवादन करत आहेत. अशातचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, सुप्रिया सुळे आदी नेत्यांनी झाशीच्या राणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रिवार अभिवादन केलं आहे. (हेही वाचा - Happy Fathers Day 2023 Messages: पितृदिनानिमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन बाबांचा दिवस करा खास!)
क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महान क्रांतिकारी वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या निस्सीम देशभक्तीस कोटी कोटी प्रणाम. pic.twitter.com/73DeUcywUC
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 18, 2023
वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांनी अखेरच्या श्वासापर्यंत इंग्रजांशी झुंज देत मातृभूमीसाठी प्राणांची आहुती दिली. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या पराक्रमाची यशोगाथा लिहिणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/kLaHavTTAa
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 18, 2023
'खुब लडी मर्दानी, वह तो झाँसी वाली रानी थी'
ब्रिटीशांविरोधात कडवी झुंज देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
My humble tribute and salutations to Rani Laxmibai on her death anniversary. pic.twitter.com/Z2L1XpuVyo
— Supriya Sule (@supriya_sule) June 18, 2023
शौर्य,राष्ट्रनिष्ठा आणि त्याग याचे प्रतिक असलेल्या झाशीच्या राणी #लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!!
त्यांचे महान कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहे.#RaniLaxmibai #JhansiKiRani pic.twitter.com/7AZqUYppQK
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) June 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)