West Bengal : पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये रविवारी रात्री इमारत कोसळून (Building Collapse)मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत आता मृतांची संख्या वाढली आहे. मृतांचा आकडा ४ वर पोहोचला आहे. त्याशिवाय अजून तेथे बचावकार्य (Rescue Operation) सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee )यांनी काही वेळापूर्वी घटनास्थळाला भेट दिली होती. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते. वैद्यकीय, अग्निशमन दल आणि इतर विभागांचे अधिकारी घटनास्थळी जखमींच्या सेवेसाठी दाखल झाले आहेत. (हेही वाचा:Kolkata Building Collapsed: इमारत बांधकामातील दोषींवर कारवाई निश्चित, मृत व जखमींच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून मदत - ममता बॅनर्जी (Watch Video) )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)