पश्चिम बंगालच्या (West Bengal) नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर रविवारी संध्याकाळी लोकल ट्रेनवर काही लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात ट्रेनचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा हा हल्ला करणारा गट निषेध करत असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एकलव्य चक्रवर्ती यांनी सांगितले की, लोकांच्या अनियंत्रित जमावाने ट्रेनवर दगडफेक केली. केवळ काही लोक जखमी झाले. तेथे सध्या एकही ट्रेन धावत नाही, आम्ही राज्य सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत.
Tweet
West Bengal | An unruly mob of 1,000 people pelted stones on the train. Few people were injured. As of now, no train is running there, we are waiting for state govt's permission: Eklavya Chakraborty, Chief Public Relation Officer, Eastern Railway
— ANI (@ANI) June 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)