Soniya Gandhi On Women's Reservation Bill: संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजचा दिवस देखील ऐतिहासिक आहे. कारण पहिल्यांदाच देशाच्या नवीन संसद भवनात कामकाज सुरू होणार आहे. दरम्यान, या विशेष अधिवेशनात अनेक विशेष विधेयकेही मंजूर होण्याची शक्यता आहे. महिला आरक्षण विधेयकावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी मंगळवारी संसद भवनात पोहोचल्या तेव्हा पत्रकारांनी त्यांना महिला आरक्षण विधेयकाबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, 'आमचे आहे, ते आमचे आहे.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)