Ram Mandir: अयोध्येतील राममंदिराच्या बांधकामाचा पहिला टप्पा यावर्षी 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बांधकाम समितीचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांनी सोमवारी सांगितले. मिश्रा यांनी सांगितलं की, मंदिर तीन टप्प्यात बांधले जात आहे आणि पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल. एएनआयशी बोलताना बांधकाम समितीच्या प्रमुखांनी सांगितले की, तळमजल्यावरील पाच 'मंडप', इतर कामांव्यतिरिक्त, पहिल्या टप्प्यात पूर्ण केले जातील. (हेही वाचा - PM Modi Visits: पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत कोणत्या देशांना भेट दिली? यावर किती खर्च झाला? हा खर्च कोण करतं? जाणून घ्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)