गुजरातच्या गोध्रा येथे 2002 साली साबरमती एक्स्प्रेसला आग लावलेल्या आठ आरोपींची सर्वोच्च न्यायालायने जामीनावर सुटका केली आहे. तर चार आरोपींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या प्रकरणातील आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची 17 वर्षे शिक्षा भोगून झाली आहे. त्यांच्या वर्तनात सुधारणा दिसत आहेत. तसंच, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवर लवकर सुनावणी होण्याची शक्यता नाही, या बाबी लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीस डी.वाय चंद्रचूड, न्यायाधीश पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने आठ जणांना जामीन दिला.
Supreme Court grants bail to eight accused persons in 2002 Godhra train coach-burning case. pic.twitter.com/UaHAZnUYRL
— ANI (@ANI) April 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)