PM Narendra Modi Inaugurated Maharishi Valmiki International Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी रोड शो केल्यानंतर आणि पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे अनावरण केल्यानंतर नव्याने बांधलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन केले. यानंतर पंतप्रधान उत्तर प्रदेशसाठी अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. विमानतळ ते रेल्वे स्थानकापर्यंत रोड शोच्या मार्गावर मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. मोदींनी त्यांच्या कारमधून लोकांना अभिवादन केले. लोकांनी पंतप्रधानांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. पंतप्रधान मोदींनी नवीन अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, अयोध्येतील नवीन विमानतळाला ऋषी कवी महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आले आहे. हे विमानतळ 'महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम' म्हणून ओळखले जाईल. (हेही वाचा - PM Narendra Modi To Visit Ayodhya Today: पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत विमानतळ, नवीन रेल्वेगाड्यांचे आज उद्घाटन; जाणून घ्या संपूर्ण तपशील)

पहा व्हिडिओ - 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)