Amit Thackeray : जसजशा निवडणूकांच्या तारखा जवळ येत आहेत. तसतशा राजकीय हलचाली वाढताना दिसत आहेत. राज ठाकरेंनी आज दिल्ली गाठत अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरेंचा ( Raj Thackeray) हा दौरा सध्या चर्चेत आहे. आत्तापर्यंत राज्यात भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतलं आहे. त्यामुळे ही भेट नव्या बदलाची नांदी मानली जाते आहे. अमित ठाकरेंनीही (Amit Thackeray ) राज ठाकरे-अमित शाहांच्या भेटीचा फोटो सोशल मीडिावर पोस्ट केला आहे. (हेही वाचा : Raj Thackeray On Ram Mandir: आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, 32 वर्षांनी शरयू नदी हसली; राज ठाकरेंनी पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)