Dr Rajendra Prasad Birth Anniversary: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी, 3 डिसेंबर रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद (Dr Rajendra Prasad) यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, 'डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे प्रगल्भ शहाणपण आणि आपल्या इतिहासातील निर्णायक क्षणांमध्ये खंबीर नेतृत्व हे अभिमानास्पद आहे. लोकशाही आणि एकतेचे चॅम्पियन म्हणून त्यांचे प्रयत्न पिढ्यानपिढ्या गुंजत राहतात. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.' 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारच्या सिवान येथे जन्मलेले, सलग दोन वेळा पुन्हा निवडून आलेले ते एकमेव भारतीय राष्ट्रपती आहेत. डॉ प्रसाद यांना 1962 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला. (हेही वाचा - PM Modi Visit Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार; राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे करणार अनावरण)
Dr. Rajendra Prasad’s profound wisdom and steadfast leadership during pivotal moments in our history are a source of great pride. His endeavours as a champion of democracy and unity continue to resonate across generations. Tributes to him on his birth anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)