Chaitra Navratri 2024 Day 5: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मातृप्रेमाचे प्रतीक असलेल्या देवी स्कंदमातेला तिच्या सर्व भक्तांवर आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या X हँडलवरून पोस्ट करत म्हटलं आहे की, 'नवरात्रीच्या काळात, मातेचे भक्त दुर्गा मातेचे पाचवे रूप, स्कंदमातेची पूजा करतात. नवचैतन्य देणाऱ्या देवी स्कंदमातेला मी प्रार्थना करतो की, तिने माझ्या देशातील सर्व कुटुंबीयांवर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करावा.' आज चैत्र नवरात्रीचा 5 वा दिवस असून या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक शास्त्रानुसार, जीवनात संतती, सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी स्कंदमातेची पूजा अत्यंत फलदायी मानली जाते.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)