Rahul Gandhi on Article 370: काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी युरोपातील तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी ते बेल्जियमला पोहोचले. राहुल गांधी यांनी शुक्रवारी प्रेस क्लब ऑफ ब्रसेल्समध्ये माध्यमांशी संवाद साधला. कलम 370 बाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. ती CWC मध्ये मंजूर झालेल्या ठरावात आहे. आमच्या देशातील प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याची मुभा आहे. काश्मीरचा विकास झाला पाहिजे, असे आम्हाला ठामपणे वाटते. काश्मीरची प्रगती झाली पाहिजे आणि तिथे शांतता असावी, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेल्जियम येथे आंतरराष्ट्रीय माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
VIDEO | "Our position on Article 370 is very clear. It's in a resolution passed in the CWC. We are for ensuring that every single person in our country has a voice, and is allowed to express themselves. We feel very strongly that Kashmir should develop, Kashmir should progress,… pic.twitter.com/7uQGoAFArE
— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)