Noida: दिल्लीत आम आदमी पार्टी सध्या वाईट दिवस पाहत असतानाच आमदारांच्या मुलांच्या गुंडागिरीच्या घटना चव्हाट्यावर आल्या आहेत. दिल्लीतील एका पेट्रोल पंपावर आम आदमी पार्टी (आप) दिल्लीचे आमदार अमानतुल्ला खान(AAP MLA Amanatullah Khan) यांच्या मुलाने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय योग्य करावाई केली जाईल असे एडीसीपी मनीष मिश्रा यांनी सांगितले आहे. मात्र, पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांला मारहाण का करण्यात आली त्याचे कारण अस्पष्ट आहे. (हेही वाचा:Akhilesh Yadav: अखिलेश यादव यांचा प्रवेश झालेला मंदिर परिसर भाजप कार्यकर्त्यांनी गंगाजल वापरुन स्वच्छ केला)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)