मणिपूरची राजधानी इंफाळ मध्ये दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ही दोन महिने जुनी घटना आहे. त्यावर मागील दोन महिन्यात कोणतीच कारवाई झाली नाही. मात्र हा व्हीडिओ वायरल झाल्यानंतर वातावरण तापलं. काल या प्रकरणी 4 जणांना अटक झाली आहे. इंफाळमध्ये महिलांनी यापैकी एका आरोपीचं घरं जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. पंतप्रधानांनी मीडीयाशी बोलताना या प्रकरणी आरोपींना कडक शासन केले जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. नक्की वाचा: मणिपूर मधील महिलांच्या विवस्त्र धिंडेचे व्हिडीओ शेअर न करण्याचे भारत सरकारचे Twitter सह अन्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्मला आदेश.
पहा ट्वीट
#WATCH | Women in Imphal burned down the house of one of the accused in Manipur viral video case, yesterday, 20th July. Four arrests have been made in the case so far. pic.twitter.com/6XOl4kdqGY
— ANI (@ANI) July 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)