शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी म्हटले की, त्यांच्या पक्षाने पुढील वर्षी महाराष्ट्रातील सुमारे 10 शहरांमध्ये होणाऱ्या नागरी निवडणुकीसाठी स्वतःहून तयारी करावी. सोबतच इतर पक्षांशी युती करण्याच्या बाजूनेदेखील त्यांचा पक्ष आहे. जर ही गोष्ट समाजास्याने घडली तर चांगलच आहे मात्र इथे पक्षाच्या भगव्या ध्वजाशी कोणतीही तडजोड होणार नाही. रविवारी पुण्याला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील भोसरी येथे शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करताना राऊत यांनी हे सांगितले.

पुढे ते म्हणाले, अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीत युतीसाठी आम्ही त्यांच्याशी तसेच शरद पवार यांच्याशी बोलू. ते जर तयार असतील ठीक अन्यथा आम्ही एकटे जाण्यास सदैव तयार आहोत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)