जम्मू-काश्मीरमध्ये बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून आज पहिल्यांदा वंदे भारत ट्रेन धावली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवरील सर्वात मोठ्या रेल्वे पुलावरून वंदे भारत धावली आहे. हा नजारा पाहताना अनेक युजर्सची छाती अभिमानाने फुलली असल्याच दिसून आलं आहे. ही वंदे भारतची ट्रायल रन होती. ही चाचणी कटरा-बडगाम रेल्वे मार्गावर करण्यात आली. या ट्रेनमध्ये एकूण 18 डबे आहेत. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात रेल्वेची जोडणी सुधारण्यासाठी अनेक रेल्वे लाईन टाकल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून ट्रेन चालवणे हे रेल्वे बोर्डाचे यश आहे. श्री माता वैष्णो देवी रेल्वे स्थानक, कटरा ते बडगाम या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची एकेरी चाचणी आज यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)