दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) बीबीसी डॉक्युमेंटरी 'इंडिया: द मोदी क्वेश्चन’च्या स्क्रीनिंगदरम्यान डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीनंतर माहितीपट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी जेएनयूच्या गेटपर्यंत मोर्चा काढला. दगडफेक करणारे विद्यार्थी कोण होते, याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही, मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

नर्मदा वसतिगृहाजवळील जेएनयू विद्यार्थी संघाच्या कार्यालयात रात्री 9 वाजता डॉक्युमेंट्री दाखवली जाणार होती. जेएनयू विद्यार्थी संघाने एक दिवस अगोदर स्क्रीनिंगची घोषणा केली होती. स्क्रीनिंगपूर्वी 8.30 वाजता संपूर्ण कॅम्पसची वीज गेली. उपस्थित विद्यार्थ्यांचा दावा आहे की, प्रशासनाने मुद्दाम वीज खंडित केली. यानंतर विद्यार्थ्यांनी जेएनयू विद्यार्थी संघाच्या कार्यालयाबाहेर गालिचे पसरवून क्यूआर कोडच्या साहाय्याने त्यांच्या फोनवर डॉक्युमेंटरी पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र इंटरनेटचा वेग कमी असल्याने विद्यार्थ्यांना ते शक्य झाले नाही. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या खोलीतून लॅपटॉप आणले आणि डॉक्युमेंटरी पाहायला सुरुवात केली. आता या विद्यार्थ्यांवर दगडफेक झाल्याची बातमी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)