दिल्लीत आज पद्म पुरस्कारांचे वितरण सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या या पुरस्कारांचे मानकरी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहचले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायिका  Suman Kalyanpur यांचा पद्म भूषण देऊन गौरव करण्यात आला आहे. सुमन कल्याणपूर यांनी 'केतकीच्या बनी तिथे...', 'केशवा माधवा' अशी अनेक भक्तीपर गीतं अजरामर केली आहेत. सोबतच त्यांनी . गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी, हिंदी मध्येही पार्श्वगायन केले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)