भारताची केंद्रीय बँक अर्थातच 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikanta Das) यांनी आज पतधोरण जाहीर केले. शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी माहिती देताना सांगितले की, आरबीआय रेपो रेट (RBI Repo Rate) अपरावर्तीत म्हणजेच त्याच कोणताही बदल न करता स्थिर ठेवत आहे. शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार रेपो रेट 6.5% इतकाच राहणार आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत गुरुवारी (6 एप्रिल) बोलत होते. त्यांनी सांगितले की, भारत भू-राजकी आणि अर्थव्यवस्थेत अभूतपूर्व अनिश्चितता पाहत आहे. दरम्यान, 2023 ची सुरुवात चांगली झाली असे सांगत ते म्हणाले की, 2022-23 मध्ये जीडीपी 7 टक्क्यांनी वाढला, जो आर्थिक परिस्थिती लवचिक असल्याचे दर्शवितो. जागतिक अर्थव्यवस्थेला नव्याने अशांततेचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.
ट्विट
RBI keeps repo rate unchanged at 6.5 pc: Governor Shaktikanta Das
— Press Trust of India (@PTI_News) April 6, 2023
दरम्यान, दास यांनी पुढे म्हटले की, जागतिक व्यापार संघटना (WTO) ने यापूर्वी 2023 साठीचा जागतिक व्यापार वाढीचा दृष्टीकोन सुधारित करून 1.7% वर (ऑक्टोबरच्या अंदाजानुसार) आणला आहे. तसेच युक्रेनमधील युद्ध, जिद्दीने उच्च चलनवाढ, कडक आर्थिक धोरण अशा घटांमुळे आर्थिक अनिश्चितता कायम असल्याची स्थिती आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)