अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात वातावरणनिर्मिती केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा यामध्ये सहभागी आहेत. या पार्श्वभूमीवर ते आपल्या एक्स हँडलवरुन दररोज वेगवेगल्या गायकांनी गायलेल्या राम भजनांचे व्हिडिओ शेअर करत आहेत. आताही त्यांनी आपल्या हँडलवरुन शिवश्री स्कंदप्रसाद यांनी गायलेले भजन शेअर केले आहे.

भजन शेअर करताना लिहीलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात कन्नडमध्ये शिवश्री स्कंदप्रसाद यांचे हे सादरीकरण प्रभू श्री राम यांच्या भक्तीच्या भावनेला सुंदरपणे अधोरेखित करते. आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी असे प्रयत्न खूप मोठे काम करतात. (हेही वाचा, Ram Mandir: अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु, पहा खास व्हिडिओ)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)