आजपासून पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे. प आज प्रजासत्ताक दिनापासून पुणे मेट्रो च्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांना पुणे मेट्रोने प्रवास अधिक सुलभ व जलद करता यावा याउद्देशाने पुणे मेट्रोचे 'एक पुणे ट्रांझिट कार्ड' 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी पहिल्या 5000 प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह उपलब्ध असतील. नेहमी 118 रुपये शुल्क असणारे हे कार्ड प्रवाशांसाठी केवळ 20 रुपयांत उपलब्ध असणार आहेत. हे कार्ड खरेदी करण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)