बिहारमध्ये राजकीय गोंधळानंतर नवीन सरकार स्थापन झाले. नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्याने 9व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासह भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर पीएम मोदींसह सीएम सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. बिहारमध्ये स्थापन झालेल्या एनडीए सरकारच्या विकासाबाबत आणि इथल्या लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण केल्याबद्दलही ते बोलले आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)