हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्यभरातून विध्वंसाचे फोटो/व्हिडिओ समोर येत आहेत. अशात पावसामुळे राज्यात ऑनलाईन लग्न झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिमलाचा ​​आशिष सिंघा याने कुलूच्या शिवानी ठाकूरशी ऑनलाइन लग्न केले. आता हे लग्न चर्चेचा विषय बनले आहे. या दोघांचा विवाह सोमवारी 10 जुलै रोजी निश्चित करण्यात आला होता, परंतु मुसळधार पावसानंतर सर्वांना लग्न रद्द होईल, असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. दोघांनी ऑनलाइन लग्न केले. पुजाऱ्याने वधू-वरांना व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांसमोर बसवले आणि मंत्रोच्चार करून त्यांचे लग्न लावून दिले. सर्व विधी देखील ऑनलाईन झाले. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर लाईव्ह करण्यात आला. (हेही वाचा: Online Game Addiction: राजस्थान मध्ये ऑनलाईन गेम्सच्या व्यसनात मुलाने गमावलं मानसिक संतुलन; पहा काय झालीय अवस्था)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)