नूह (Nuh) येथे उसळलेल्या आणि गुरुग्रामपर्यंत (Gurugram) पसरलेल्या हिंसक संघर्षात मृतांची संख्या पाचवर गेल्यानंतर संपूर्ण हरियाणामध्ये (Haryana) हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी नूह जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कलम 144 (Section 144 ) लागू करण्यात आले असून मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दरम्यान, हरियाणाच्या नूह येथील व्हिज्युअल्स जिथे 31 जुलै रोजी दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर पोलीस दल तैनात करण्यात आले होते. आपण खाली पाहू शकता. हरियाणातील गुरुग्राममध्ये मंगळवारी शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटरसह सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)