आज दोन टप्प्यांमध्ये नव्या संसद इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. सकाळी पूजा विधी झाल्यानंतर दुपारी 12 नंतर या लोकार्पण सोहळ्यासाठी संसद भवानाच्या आतमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी Rajya Sabha Deputy Chairman Harivansh यांनी President Droupadi Murmu यांचा संदेश वाचून दाखवला आहे. दरम्यान अनेक विरोधी पक्षांनी या सोहळ्याला राष्ट्रपतींना आमंत्रण नसल्याने, त्यांची उपस्थिती नसल्याने तसेच संसद इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार नसल्याने नाराजी बोलून दाखवली होती. President Droupadi Murmu यांची हजेरी नसली तरीही त्यांचा संदेश या कार्यक्रमात वाचून दाखवण्यात आला आहे. New Parliament Building Inauguration Live Streaming: नव्या संसद इमारतीच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला सुरूवात; इथे पहा थेट प्रक्षेपण .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)