New Chief Justice of India: न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले की, न्यायमूर्ती संजीव खन्ना 11 नोव्हेंबर रोजी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते देशाचे 51 वे सरन्यायाधीश असतील. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 6 महिन्यांचा असेल व ते 13 मे 2025 रोजी निवृत्त होतील. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांची जागा घेतील. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती. सरकारने मावळत्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून मेमोरँडम ऑफ प्रोसिजरनुसार त्यांच्या शिफारसी पाठवण्यास सांगितले होते. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
दरम्यान, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याचे शिक्षण घेतले. पदवीनंतर त्यांनी 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यापूर्वी ते 14 वर्षे दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. 2019 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली. (हेही वाचा: SC Bar Association On New Lady Justice Statue: 'हा एकतर्फी निर्णय'; न्यायदेवतेच्या पुतळ्यात बदल केल्याप्रकरणी एससी बार असोसिएशनची नाराजी)
New Chief Justice of India:
Centre notifies the appointment of Justice Sanjeev Khanna as the next Chief Justice of India, effective from November 11th. His appointment follows the retirement of the current Chief Justice DY Chanderchud pic.twitter.com/tX6ZjjlPqS
— ANI (@ANI) October 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)