मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत सायबर फसवणुकीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. पोलिसांनी संभाव्य पीडितांचे विविध बँक खात्यांमध्ये वळते करण्यात आलेले 80 लाख रुपये ब्लॉक करण्यात यश मिळवले. ही कामगिरी मुंबई पोलिसांनी सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 टीमच्या मदतीने पार पाडण्यात आली.

सार्वजनिक सूचना जारी करत पोलिसांनी म्हटले आहे की, नागरिकांना सतर्क राहण्यासाठी आणि त्यांची सायबर जागरूकता वाढवण्यासाठी हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. सायबर फसवणूक वाढत असताना, वैयक्तिक जागरूकता ही महत्त्वाचे बनते. नागरिकांनी स्रोत सत्यापित करून, मजबूत संकेतशब्द (पासवर्ड) वापरून आणि कोणत्याही संशयास्पद कृतीची त्वरित तक्रार करून आपली सुरक्षा मजबूत करायला हवी. सायबर फसवणुकीला बळी पडल्यास, त्वरीत कार्य करा आणि सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधा, असे अवाहनही पोलिसांनी केले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)